कें.प्रा.शाळा,चिकलठाणा बु. येथे ‘आनंदनगरी’ उत्साहात पार पडली
चिकलठाणा (बु.) दिनांक २७ जानेवारी : आज कें.प्रा.शाळा,चिकलठाणा (बु.) ता.सेलू येथे प्रजासत्ताक दिना निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . या सर्व स्पर्धांचा शेवट ‘आनंदनगरी’ ने करण्यात आला. आजच्या आनंदनगरीचे उद्घाटन श्री.उस्मानाखा पठाण (अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती) यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमापूजनाने व फीत कापून करण्यात आले.
आनंदनगरी मध्ये मुलांनी इडली-सांबर, वडापाव, ढोकळा, भेळ, केक, फळांचा गाडा, फिंगर चिप्स, डाळबाटी, भजे, पोहे यासारखे किती तरी पदार्थ करून आणले होते. हे पदार्थ केवळ सर्वांच्या आनंदासाठी ५ रु. या नाममात्र किंमतीत ठेवल्यामुळे सर्वांनी त्याचा मनसोक्त स्वाद घेतला. या उपक्रमात ४२ मुलांनी सहभाग घेतला ; तर सर्व गावकऱ्यांचा ही प्रचंड प्रतिसाद लाभल्यामुळे मुलांचे सर्व पदार्थ लवकरच संपले होते. सर्व मिळून ३५७० रु. व्यवहार होऊन ‘आनंदनगरी’ सर्वाना आनंद देऊन कायमची आठवण ठेवून संपली.