Saturday, January 27, 2018

कें.प्रा.शाळा,चिकलठाणा बु. येथे ‘आनंदनगरी’ उत्साहात पार पडली 

चिकलठाणा (बु.) दिनांक २७ जानेवारी : आज कें.प्रा.शाळा,चिकलठाणा (बु.) ता.सेलू येथे प्रजासत्ताक दिना निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . या सर्व स्पर्धांचा शेवट ‘आनंदनगरी’ ने करण्यात आला. आजच्या आनंदनगरीचे उद्घाटन श्री.उस्मानाखा पठाण (अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती) यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमापूजनाने व फीत कापून करण्यात आले.
आनंदनगरी मध्ये मुलांनी इडली-सांबर, वडापाव, ढोकळा, भेळ, केक, फळांचा गाडा, फिंगर चिप्स, डाळबाटी, भजे, पोहे  यासारखे  किती तरी पदार्थ करून आणले होते. हे पदार्थ केवळ सर्वांच्या आनंदासाठी ५ रु. या नाममात्र किंमतीत ठेवल्यामुळे सर्वांनी त्याचा मनसोक्त स्वाद घेतला. या उपक्रमात ४२ मुलांनी सहभाग घेतला ; तर सर्व गावकऱ्यांचा ही प्रचंड प्रतिसाद लाभल्यामुळे मुलांचे सर्व पदार्थ लवकरच संपले होते. सर्व मिळून ३५७० रु. व्यवहार होऊन ‘आनंदनगरी’ सर्वाना आनंद देऊन कायमची आठवण ठेवून  संपली.
‘आनंदनगरी’ आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एम.आर काष्टे, सर्व शिक्षक वृंद श्री.राजेंद्र होलसुरे,श्री.बाबासाहेब काष्टे, श्री.प्रवीण कुलकर्णी, श्रीम.पुष्पलता भोसले, श्रीम.महानंदा सोनटक्के, श्रीम. सारिका दवणे, श्रीम.मेघा देशपांडे, श्रीम.शकुंतला रासवे व परीचर श्री.रंगनाथ आवाड यांनी मेहनत घेतली.